आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोअरसाठी खोदकाम मर्यादा २०० फुटांपर्यंतचीच करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - वारेमाप भूजल उपशावर प्रतिबंध घालण्यासाठी २०० फुटांपेक्षा अधिक खोलीवर बोअर घेण्यास राज्यात बंदी घालणारा कायदा करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी ही माहिती दिली.

लोणीकर म्हणाले, अनेक ठिकाणी पाण्याच्या शोधात लोक थेट पाचशे, हजार फूट खोल बोअर घेत असल्याचे दिसते. यामुळे भूजल साठे वेगाने संपत आहेत. यातून ओढवणारे भविष्यातील संकट रोखण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे. त्याचे प्रारूप तयार करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या (पुणे) ऑक्टोेबर २०१४च्या सर्वेक्षणानुसार, १९ तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता. मात्र, याच तालुक्यांतील भूजल पातळी १ मीटरने खालावल्याचे दिसले.

सध्या २५० फूटांची मर्यादा
सध्या सरकारी कूपनलिकेसाठी २५० फुटांची तर दुष्काळी भागासाठी ५०० फुटांची मर्यादा आहे.

परवाना रद्द, आर्थिक दंड
प्रस्तावित कायद्याचा भंग करणा-या बोअर मशीनचा व वाहनाचा परवाना रद्द करणे, आर्थिक दंड अशा शिक्षेची तरतूद केली जाईल.