आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्ता सांगण्याचे निमित्त करून पुण्यात तरुणीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पत्ता सांगण्याचा बहाणा करून मुंबईच्या तरुणीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नोव्हेर सेव्हिओ जोसेफ (रा. कॅम्प, पुणे) या आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता आठ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अटक केलेला आरोपी हा बाऊन्सरचे काम करत असून तरुणीने आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून मित्राला केलेल्या फोनमुळे आरोपी सहज सापडला. पीडित तरुणीचे बारावीपर्यंत शिक्षण परदेशात झाले आहे. सध्या ती पुण्यात एफवाय बीएचे शिक्षण घेत आहे. तिच्या आजीवर फातिमानगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री आजीला रुग्णालयात सोडून मित्राकडे जात असताना डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पत्ता विचारण्यासाठी थांबली. त्यावेळी जोसेफने चुकीचा पत्ता सांगत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून तो पसार झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस तपास करत आहेत. ठाण्याचे पोलिस निरीक्षक रिहाना शेख याप्रकरणी पुढील तपास करत आहे.