आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- बुधवार पेठेत देहविक्री करणार्‍या महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बुधवार पेठेत देहविक्री करणार्‍या महिलेची तिच्या प्रियकराकडून निर्घृन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल मंगळवारी (23 मे) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.
 
बिनी मुल्ला (वय-22, रा.जनता बिल्डिंग, बुधवार पेठ, पुणे, मूळ पश्चिम बंगाल) असे मृत महिलेचे नाव आहे. ती बुधवार पेठेत राहात होती. मारेकरी सुखदेव रामदास मडावी (वय-27, रा. वडारवाडी, पुणे, मूळ रा. गणेशवाडी, ता.कळंब,जि.यवतमाळ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, हत्या झालेली महिला बुधवार पेठेत राहात होती. सुखदेवचे तिच्यावर प्रेम होते. तो नेहमी तिच्याकडे येत होता. दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सुखदेवने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. ती जागेवरच गतप्राण झाली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...