आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribing Income Tax Officer Get Four Years Custody

लाचखोर आयकर अधिका-यास चार वर्षे कैद, 20 हजारांचा दंड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एका व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेणा-या आयकर अधिका-याला विशेष न्यायाधीश सुधाकर यर्लगड यांच्या न्यायालयाने चार वर्षे कैद व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मनीष शशिकांत नाडकर असे आरोपीचे नाव आहे.


अमिर पोल्ट्री फार्मसचे मालक विजय झुंबेरमोरे यांना व्यवसायासाठी 2002-03 सालचे प्रमाणपत्र देणे व जुनी प्रकरणे उघड न करण्यासाठी नाडकरने एक लाख रुपये लाच मागितली होती. झुंबेरमोरे यांनी लाचलुचपत विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. सीबीआयने 15 मार्च 2005 रोजी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या जवळून एक लाख 50 हजार रुपये व मोटारीतूनही एक लाख 50 हजार रुपये जप्त केले होते.