आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribing Mahavitran Engineer Has Two And Half Crores, Court Coustduy

लाचखोर महावितरणाच्या अभियंत्यांकडे अडीच कोटींची माया, 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी महावितरणच्या चार अभियंत्यांना अटक केली होती. अधिक तपासणी करून या चौघांकडील एकूण दोन कोटी 46 लाख 16 हजार रुपये किमतीची बेहिशेबी मालमत्ता पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, न्यायालयाने गुरुवारी त्यांना 28 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


भानुदास भोसले (कार्यकारी अभियंता) : सोन्या -चांदीचे दागिने, दोन फ्लॅट, बॅँक खात्यात 34 लाख 53 हजार रुपये आढळून आले.
सदाशिव सरपाले (कनिष्ठ अभियंता) : 10 लाखांचे दागिने, 15 लाखांची जमीन, बँकेत 7.84 लाख रुपये, चार लाखांची वाहने अशी 60 लाख 77 हजार रुपयांची संपत्ती.
लक्ष्मीकांत जोंधळे (कनिष्ठ अभियंता): 35 लाखांच्या मुदतठेवी, 49 लाखांचे दोन फ्लॅट, बँकेत एक लाख 44 हजार रुपये असे एकूण 87 लाख 70 हजार रुपये आढळून आले.
प्रशांत पराते (उपकार्यकारी अभियंता) : 47 लाखांची सदनिका, साडेचार लाखांची वाहने, बँकेत 3.25 लाख, 3.10 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.