आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सापडला ब्रिटिशकालीन बॉम्बगोळा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- उत्खननातून प्राचीन वा ऐतिहासिक संस्कृती प्रकाशात येतात, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, आयटी हब म्हणून प्रसिद्ध असणा-या पुण्याच्या हिंजवडीजवळ एका बांधकामाच्या खोदकामात शनिवारी चक्क ब्रिटिशकालीन बॉम्बगोळा सापडला आहे.

हिंजवडी येथे एक बांधकाम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम सुरू होते. तेथून जाणा-या एका कामगाराचे बॉम्बगोळ्याकडे लक्ष गेले. त्याने तातडीने हिंजवडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली. तातडीने बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणी करून तो बॉम्बच असल्याचे स्पष्ट झाले.