आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराला घरपण देणारा माणूस अडचणीत; डीएसकेंच्या पुणे, मुंबईतील घरांवर पोलिसांचे छापे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- बांधकाम व्यवसायिक व डीएसके कंपनीचे मालक दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती कुलकर्णी यांच्याविराेधात अार्थिक गुन्हे शाखेकडे ३५१ ठेवीदारांनी तक्रार अर्ज दाखल केेले आहेत. सुमारे १२ काेटींची फसवणूक झाल्याचे समाेर अाले अाहे. गुरुवारी ४ विशेष पोलिस पथकांनी डीएसकेंच्या पुणे, मुंबईतील कार्यालय, निवासस्थानांवर छापे टाकले. यात कागदपत्रे, हार्डडिस्क, पेन ड्राइव्ह, व्यवहारांच्या फाइल, २ गाड्या जप्त केल्या.

डीएसकेंविरुद्ध जितेंद्र नारायण मुळेकर यांच्यासह ४१ गुंतवणूकदारांनी तक्रार दिल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात अार्थिक फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियम १९९९, कलम ३-४ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. .

तक्रारदारांसाठी व्हाॅट‌्सअॅप ग्रुप : अार्थिक-सायबर शाखेचे पोलिस उपअायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले की, तक्रारदार नागरिकांसाठी सकाळी १० ते ५.३० पर्यंत संगम ब्रीज, पुणे कार्यालयात ०२०-२५५४००७७ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला अाहे. तपासाबाबत माहिती मिळावी व अफवांना कुणी बळी पडू नये म्हणून त्यांचे व्हाॅट‌्सअॅप ग्रुप करून त्यावर नागरिकांना माहिती देण्यात येणार अाहे. तसेच प्रत्येक शनिवारी फसवणूक झालेल्या नागरिकांची बैठक त्यांना तपासाची माहिती देण्यात येणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... ड‍ीएसकेंच्या घर-कार्यालयांवर पडलेल्या क्राइम ब्रॅंचच्या छापेमारीचे फोटो आणि व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...