आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षकावर गोळीबार करुन कार पळवली; यवत येथे सोलापूर रस्त्यावर घडलेला थरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवत येथे ही घटना घडली आहे. - Divya Marathi
यवत येथे ही घटना घडली आहे.
पुणे- दौंड तालुक्यातील नानवीज येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक महेश शिवलिंगप्पा निळगंजी (वय 51) यांच्यावर यवत ( ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर महती कंपनीजवळ 3 अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर उजव्या पायावर पिस्तुलातून गोळी झाडीत त्यांच्या ताब्यातील स्वीफ्ट डिझायर कार ( एमएच 12 एन यु 9244) पळवून नेल्याची घटना आज ( दि.11) रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.
 
जखमी निळगंजी यांना प्राथमिक उपचारासाठी यवत येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी आहे की, निळगंजी यांच्या गाडीच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची  मारूती इरटीका गाडी होती. हल्लेखोरांनी निळगंजी यांना गाडीच्या मागच्या चाकाची डिस्क निघाली असल्याचे सांगितले. त्यामुळे निळगंजी यांनी गाडी थांबवली आणि ते बाहेर आले त्याचवेळी मारूती गाडीतील चौघांपैकी एकाने त्यांच्या डाव्या पायावर गोळी झाडली तर दुसऱ्याने त्यांच्या उजव्या पायावर लोखंडी रॉडने मारले. निळगंजी त्यामुळे जागेवरच कोसळले त्यानंतर हे चोरटे त्यांची गाडी घेऊन पळाले.
 
महेश निळगंजी दोन महिन्यांपूर्वीच ते नानवीज येथे रूजू झाले आहेत. यापुर्वी ते गडचिरोली येथे होते. घटनास्थळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.संजय पखाले, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. अज्ञात आरोपी विरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.      
                                                             
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
                
बातम्या आणखी आहेत...