आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना भीषण आग, लाखोंचे नुकसान; जीवित हानी नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजगुरुनगर / खेड -  पुण्यातील खेड तालुक्यामधील राजगुरुनगर परिसरात इलेक्ट्रॉनिक्सच्या दोन दुकानांना आग लागली आहे. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक महितीनुसार, राजगुरुनागर परिसरातील दोन इलेक्ट्रॉनिक्स दुकानांना भीषण आग लागली असता तेथे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी लवकर पोहचल्या आहेत. या घटनेत जीवितहानी झालेली नाही परंतु इलेक्ट्रॉनिक्सची साधने जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसत आहे.  राजगुरुनगर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगेवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
बातम्या आणखी आहेत...