आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Burning Youth Driver Died At Pune, Car Owner Arrested By Police

पुणे: कार मालकाने पेटवून दिलेल्या ड्रायव्हरचा उपचारादरम्यान मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मालकाकडून घेतलेले पैसे रूपये परत न दिल्याने रागाने केलेल्या मारहाणीनंतर पेटवून दिलेल्या जखमी अनिल क्षीरसागर (वय 26, रा. महंमदवाडी) या ड्रायव्हरचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्षीरसागर याच्यावर पुण्यातील शासकीय ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेत क्षीरसागर 90 टक्के भाजलेला होता. याप्रकरणी धनंजय गुलाब घुले (वय 26), दिनेश लक्ष्मण चव्हाण (वय 25) आणि अक्षय सुग्रीव पोळ (वय 19) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल क्षीरसागर हा युवक घुले यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता. त्याने पन्नास हजार रुपयांची उचल घेतली होती. त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे त्याने काम सोडले होते. त्यामुळे पैशाची मागणी घुले करीत होते. चार दिवसापूर्वी भाजी मंडई येथून तिघांनी क्षीरसागर याला उचलून महंमदवाडी येथील घुले यांच्या कार्यालयात आणले. उचल परत देत नसल्यामुळे चिडून तिघांनी मारहाण केली. तसेच बळजबरीने दारू पाजून त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत अनिल 90 टक्के भाजला होता.
दरम्यान, या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र कांबळे, हणमंत साठे, नवनाथ कांबळे, शांतिलाल चव्हाण यांनी आरोपींविरुद्ध ऍट्रॉसिटी आणि सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.