आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Ride, Yoga Session For Bank Chiefs In Retreat With PM Modi

पुण्यात आजपासून ज्ञानसंगम; टॉप बँकर्सशी मोदी करणार \'ऑन बोर्ड\' चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील मूलभूत बदलांची नांदी आजपासून सुरू होणाऱ्या 'ज्ञानसंगम' परिषदेच्या रूपाने गायली जाणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, अर्थमंत्रालयातील अन्य ज्येष्ठ अधिकारी तसेच बँकिंग क्षेत्रातील सर्व राष्ट्रीय सहकारी तसेच खासगी क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय महत्त्वाच्या या परिषदेतून बँकिंग क्षेत्रातील आमूलाग्र परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत. मुख्य म्हणजे या परिषदेसाठी माध्यमाच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला आहे. सर्व चर्चा, विचारमंथन बंद सभागृहात होणार आहे. पंतप्रधान दोन दिवस पुण्यात राहणार असल्याने परिषदेचे स्थळ असणाऱ्या एनआयबीएम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई-पुणे प्रवास बसने करणार असल्याने सुरक्षा रक्षकांचा वेढा घालण्यात येत आहे. तसेच योगाही करणार आहेत.