आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडी पावसाला हवी बंगालच्या उपसागराची साथ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - देश आणि राज्यात धो धो बरसणारा पाऊस मराठवाड्यात मात्र अजून म्हणावा तसा बरसलाच नाही. जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैमध्ये तो दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्यासाठी बंगालच्या उपसागरात विशिष्ट हवामानाची निर्मिती (मेट्रॉलॉजिकल सिस्टिम्स) आवश्यक आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात उपसागरात असे हवामान निर्माण न झाल्याने मराठवाड्यात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाही, असे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्रीय संस्था (आयआयटीएम) येथील वरिष्ठ हवामानतज्ज्ञांनी दिले आहे. सध्या राज्यात पडणारा पाऊस हा प्रामुख्याने पश्चिम भागातील अरबी समुद्रात निर्माण झालेल्या विशिष्ट हवामानाची परिणती आहे.


मान्सूनचे बाष्पयुक्त ढग पश्चिमेकडून येताना सह्याद्रीच्या रांगांमुळे आधी अडवले जातात. त्यामुळे राज्याच्या पश्चिम भागात भरपूर पाऊस पडतो. हेच ढग जसजसे अंतर्गत भागात येतात तसतसे त्यातील बाष्प कमी होत जाते. वा-यांचा जोरही मंदावतो. कमजोर झालेले हे वारे राज्याच्या अंतर्गत भागात येणा-या मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणच निर्माण करतात. त्यांच्यातील बाष्प नगण्य राहिल्याचा फटका मराठवाड्याला सहन करावा लागतो, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी सांगितले. याउलट बंगालच्या उपसागरात मेट्रॉलॉजिकल सिस्टीम्स (कमी दाबाचा पट्टा, चक्रवात इत्यादी) निर्माण होतात तेव्हा वा-यांची दिशी बदलते. त्याचा फायदा आधी विदर्भाला मिळतो आणि तेच वारे प्रामुख्याने मराठवाड्यात पाऊस आणतात. मराठवाडा हा निसर्गत: कमी पावसाचा प्रदेश असल्याने पर्जन्याची सरासरीही कमी आहे. त्यामुळे एकूण पावसाचे प्रमाण कमीच दिसते, असे डॉ. केळकर यांनी म्हटले आहे.


झालेल्या विशिष्ट हवामानाची परिणती आहे. मान्सूनचे बाष्पयुक्त ढग पश्चिमेकडून येताना सह्याद्रीच्या रांगांमुळे आधी अडवले जातात. त्यामुळे राज्याच्या पश्चिम भागात भरपूर पाऊस पडतो. हेच ढग जसजसे अंतर्गत भागात येतात तसतसे त्यातील बाष्प कमी होत जाते. वा-यांचा जोरही मंदावतो. कमजोर झालेले हे वारे राज्याच्या अंतर्गत भागात येणा-या मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणच निर्माण करतात. त्यांच्यातील बाष्प नगण्य राहिल्याचा फटका मराठवाड्याला सहन करावा लागतो, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांनी सांगितले. याउलट बंगालच्या उपसागरात मेट्रॉलॉजिकल सिस्टिम्स (कमी दाबाचा पट्टा, चक्रवात इत्यादी) निर्माण होतात तेव्हा वा-यांची दिशी बदलते. त्याचा फायदा आधी विदर्भाला मिळतो आणि तेच वारे प्रामुख्याने मराठवाड्यात पाऊस आणतात. मराठवाडा हा निसर्गत: कमी पावसाचा प्रदेश असल्याने पर्जन्याची सरासरीही कमी आहे. त्यामुळे एकूण पावसाचे प्रमाण कमीच दिसते, असे डॉ. केळकर यांनी म्हटले आहे.


भौगोलिक स्थान हे कारण
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणा, रायलसीमा कमी पावसाचा प्रदेश आहे. बाष्पयुक्त ढग तयार होण्यासाठी वा-यांची ऊर्ध्वगती आवश्यक असते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध ही क्रिया असते. ऊर्ध्वगतीमुळेच ढग बाष्पयुक्त बनतात व पाऊस पडतो. मराठवाड्यासह अन्य कमी पावसाच्या प्रदेशात अद्याप ही क्रिया घडलेली नाही. त्यासाठी बंगालच्या उपसागरात तीव्र घनतेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची आवश्यकता आहे.’
डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, वरिष्ठ शास्त्रज्ञ


पाऊस कमी का?
मराठवाड्याचे भौगोलिक स्थान निसर्गत: पर्जन्यछायेच्या प्रदेशात. यामुळे मुळातच येथे पावसाचे प्रमाण कमी.
पश्चिमेकडील मान्सूनच्या ढगातील बाष्प अंतर्गत भागात येताना विरते, काही वेळा कमी होते.
मान्सूनची सध्या केवळ सुरुवात, अद्याप पावसाचे साडेतीन महिने बाकी बंगालच्या उपसागरात
तूर्त तरी अपेक्षित हवामानस्थितीचा अभाव.


दमदार पाऊस पडेल
पाऊस सुरू होऊन आठ-दहा दिवस झाले आहेत. इतक्यातच अनुमान काढणे योग्य नाही. मराठवाडा, कर्नाटक व आंध्रचा अंतर्गत भाग अद्याप कोरडा आहे. मान्सूनकाळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होत असतात. त्यांच्या तीव्रतेनुसार पाऊस पडतो. अंतर्गत भागातील स्थानामुळे मराठवाड्यात मान्सूनचे वारेही विलंबाने पोचतात. मराठवाड्यात पावसासाठी अनुकूल हवामानशास्त्रीय सिस्टिम्स निर्माण होण्याची शक्यता आहे.’ डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक, हवामानशास्त्र विभाग