आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅब चालकाचा हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू; हिंजवडीत पोलिसांना आढळले होते बेशुद्ध अवस्थेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कॅब चालकाचा गाडी चालवताना ह्दय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी फेज 2 येथील विप्रो सर्कल रस्त्यावर घडली आहे. याबाबत हिंजवडी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या नवनाथ विश्वनाथ गौंड (वय 41, रा. मारुंजी, मुळ गाव. लातूर) याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. 
 
हिंजवड़ी पोलिसांनी सांगितले की नवनाथ हे आयटी पार्क मधील कंपन्यांच्या अभियंत्यांना पीकअप-ड्रॉप करतात. शुक्रवारी दुपारी विप्रो सर्कलच्या रस्त्यावर (एमएच 14, एनएक्स 1032) ह्या क्रमांकाची इंडिका मोटार लावून स्टेअरिंगवर डोक ठेवून ते झोपल्याचे दिसले. काही वेळाने कंपन्या सुटल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने वाहतूक पोलिस मोटार बाजूला घे म्हणून सांगण्यासाठी गेले असता काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. हिंजवडी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता ते हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बातम्या आणखी आहेत...