आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cag's Loan Report Is Teap Up Of Scame Raju Shetty

कॅगचा कर्जमाफी अहवाल हे घोटाळ्याच्या हिमनगाचे टोक - राजू शेट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - कर्जमाफीबाबत ‘कॅग’ने संसदेत सादर केलेला अहवाल हे या घोटाळ्यातील केवळ हिमनगाचे टोक आहे. कॅगने फक्त 90 हजार खाती तपासली. कर्जमाफी झालेली 4.25 कोटी शेतक-यांची खाती तपासली, तर शेतक-यांच्या टाळूवरील लोणी खाणा-यांची यादी सीबीआय चौकशीतूनच समोर येईल, असे मत खासदार राजू शेट्टींनी व्यक्त केले.
‘दिव्य मराठी’शी बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांनी शेतक-यांना पाठवलेल्या पत्रात 71 हजार कोटी रूपये कर्जमाफी केल्याचे सांगितले आहे. शेतक-यांचा खासदार या नात्याने मी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांना 29 ऑगस्ट रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी देशातील शेतक-यांना 69 हजार 998 कोटी रूपये कर्जमाफ केल्याचे उत्तर दिले होते.

खिसे भरण्यासाठी कर्जमाफी
कॅगच्या अहवालानुसार 3.45 कोटी शेतक-यांना फक्त 52 हजार कोटींची माफी मिळाल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी जाहीर कर्जमाफीच्या आकडेवारीत तफावत असून 19 हजार कोटी रूपयांच्या हिशोबातील घोटाळा सीबीआयकडून तपासायला हवा.