आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-नाशिक महामार्गावर कारचा अपघात, माजी उपमहापौराच्या मुलांसह तिघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे- नाशिक महामार्गावर चाकणजवळ काल रात्री पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या कार अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण जखमी झाले आहेत. मृतात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर शरद बो-हाडे यांच्या 24 वर्षीय मुलाचा समावेश आहे. खेड-राजगुरुनगर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असताना पुलाच्या कठड्याला या तरूणांची व्हॅगन आर गाडी धडकली व त्यानंतर ती 20 फूट खोल नाल्यात जावून कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. चाकणजवळील वाकी गावात काल रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला.
प्रीतम शरद बो-हाडे (24), प्रतीक विवेक सातारकर (23) आणि सागर सामचंद परदेशी (26) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. तर, सोमनाथ विठ्ठल बो-हाडे (33) आणि स्वप्निल सुभाष बोरोटे (21) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. वरील सर्व जण मोशीतील राहणारे आहेत.