आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भीमा नदीच्या बंधार्‍यात कार पडून तीन महिलांसह चौघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भीमा नदीच्या बंधार्‍यात कार पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने काल (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. नंदा दीपक गायकवाड, नवनाथ हरिभाऊ पवार, प्रतिभा नवनाथ पवार आणि आबा प्रल्हाद जठार अशी मृतांचे नावे आहेत. बारामतीहून परतत असताना ही दुर्घटना घडली. मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...