आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: जुन्या कात्रज बोगद्याजवळ इंडिका दरीत कोसळली, 7 जखमी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- एसटीने धडक दिल्याने आज सकाळी 11 च्या सुमारास पुण्याजवळ जुन्या कात्रज बोगद्याजवळ एक इंडिका कार 100 फूट दरीत कोसळली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.
सुरेश शेठे ( 50), सागर शेठे (27), आरती शेठे ( 24), आकाश तांगडे (20), अश्विनी खेडकर (20), स्वराज शेठे ( 3 महिने) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत कात्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वारगेट डेपोची एसटी भोरहून पुण्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी पुण्याकडून भोरच्या दिशेने जाणा-या इंडिकाला एसटीची धडक बसली. त्यानंतर इंडिका 100 फूट दरीत कोसळली. यात इंडिकामधून प्रवास करणारे वरील सातही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना धनकवडीतील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
खंडाळ्यात विचित्र अपघात, वाहतुकीचा खोळंबा, पुढे छायाचित्रातून पाहा खंडाळ्यात पलटी झालेला ट्रक...