आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याजवळील कार अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भरधाव कार पुलाच्या कठड्यास धडकून शेजारील नाल्यात पडल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण जवळील वाकी येथे शनिवारी हा अपघात झाला. प्रीतम शरद बोहाडे (वय 24), प्रतीक विवेक साताडकर (23) व सागर रामचंद्र परदेशी (26) अशी मृतांची नावे आहेत. प्रीतम हे पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर शरद बोहडे यांचा पुत्र होत.
तर स्वप्निल सुभाष बोराटे (21) व सोमनाथ विठ्ठल बोहाडे (33) हे गंभीर जखमी झाले. सदर पाचजण शुक्रवारी रात्री सव्वाअकरा वाजता राजगुरुनगर येथे नाइट क्रिकेट सामन्यासाठी कारने (एमएच 14 इसी 2402) चालेले होते. भरधाव चाललेल्या कारचालकास वाकी येथे वळणाचा अंदाज न आल्याने त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कारची ओढ्यावरील संरक्षक कठड्यास जोरदार धडक बसली. कार कठडा तोडून ओढ्यात 20 ते 25 फूट खाली पडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी जवळील मोशी येथील तीन तरुण एकाचवेळी गेल्याने गावावरशोककळा पसरली.