आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; एक गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवड- पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर कार चालकाचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात एक गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त कार मुंबईकडून पुणेकडे जात होती. सोमाटणे येथे आज (शनिवारी) सकाळी साडे सातला हा अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की या कार चक्काचूर झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात जाणारी कारच्या (एम.एच.48- ए.सी.6579) चालकाचा ताबा सुटून समोरून येणार्‍या कंटेनरवर आदळली. अपघातात कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून निखिल शहा (वय- 22,  रा.मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याला निगडीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...