आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांनी घेतला आणखी एक बळी, कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीवरच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असणाऱ्या भीमाशंकर शिरूर राज्यमार्ग खड्यांचे साम्राज्य वाढतच चालली आहे. राज्यमार्गावरील धुओली गावाजवळ खड्ड्यामुळे कार आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) सकाळी हा अपघात झाला आहे. अनिल जठार असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

सूत्रांनुसार, शिरुर ते भीमाशंकर या राज्यमार्गावर अक्षरशाह खड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. धुओली गावाजवळ खड्डे चुकवत कार आणि दुचाकी असताना इको कार आणि दुचाकी समोरासमोर आल्याने धडक जोरदार बसली आणि या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अनिल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच, राजगुरूनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

 

एकीकडे भाजप मंत्री 15 डिसेंबरपर्यंत खड्डे बुजवण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, दुसरीकडे खड्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे राज्यसरकार 15 डिसेंबरपर्यंत खड्डे बुजविण्यात अपयशी ठरताना दिसून येत आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...