पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ऑल्टो कारचा अपघात होऊन तिने पेट घेतल्यामुळे आई व लहान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पनवेलमधील एका रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील रासायनी या गावाजवळ आज (मंगळवारी) सकाळी घडली. सोनम महेंद्र लोहार (28) व उर्वी महेंद्र लोहार ( 3 वर्षे) असे मृत्यू झालेल्या मायलेकीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहार कुटुंबिय मुंबईहून पुण्याकडे अल्टो कारने येत होते. मात्र, रायगड जिल्ह्यातील रासायनी गावाच्या हद्दीत हायवेवरून कार एका नाल्यात कोसळली. कार नाल्यात कोसळताच अल्टोने पेट घेतला. त्यात सोनम व त्यांची मुलगी ऊर्वी या गंभीर भाजल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील आणखी तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पनवेलमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुढे पाहा, हायवेवरून नाल्यात पडलेली कार...