आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Car Collapse In Rever, Teacher Death Near Siddhateck

कार नदीत कोसळून शिक्षकाचा मृत्यू, सिद्धटेकमधील दुर्घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत /बारामती- दौंडकडे भरधाव जाणारी कार भीमा नदीवरील पुलावरून खाली कोसळून एकाला जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे रविवारी घडली. रोहिदास काळे (आंजेवाडी, ता. श्रीगोंदे) असे मृताचे नाव आहे. ते काष्टी येथील शाळेत प्राथमिक शिक्षक होते.
रोहिदास काळे रविवारी दुपारी आपल्या सॅन्ट्रो कारने (एमएच १६ एजे ३६८२) दौंडकडे जात होते. सिद्धटेक येथील भीमा नदीवरील पुलावरून जाताना काळे यांचे नियंत्रण सुटल्याने कार पुलावरून खोल पाण्यात कोसळली. पाण्यात बुडून काळे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी क्रेनच्या साहाय्याने मदतकार्य सुरू केले. काही वेळानंतर पुणे येथून एनडीआरएफचे पथक घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थ एनडीआरफच्या पथकाला कारसह काळे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.