आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Filed Against 42 In Pune Riot, 13 People Arrested

पुण्यातील दंगलप्रकरणी ४२ जणांवर गुन्हा, १३ जण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पर्वती दर्शन भागात मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दाेन गटांत क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीचे पर्यवसान दंगलीत झाले. पाेलिसांच्या हस्तक्षेपानंतर रविवारी या भागातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून ४२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. यापैकी १३ जणांना अटक करण्यात अाली.

याप्रकरणी परस्पर विराेधी गटाच्या दाेन तक्रारी व स्वारगेट पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणात अाणण्यासाठी हवेत केलेल्या गाेळीबाराचा एक असे एकूण तीन गुन्हे दत्तवाडी पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात अाले अाहेत. दगडफेकीत १२ जण जखमी झाले अाहेत. तसेच ११ रिक्षा, २१ दुचाकी, नऊ चारचाकी अंदाजे एक लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले अाहे. पाेलिसांनी वेळीच दाेन राउंड हवेत गाेळीबार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

महिलांवरील अत्याचाराचा विशेष तपास : या दंगलीत १० ते १२ महिलांवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न हल्लेखाेरांनी केला हाेता. त्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पाेलिस निरीक्षक प्रतिभा जाेशी यांचे एक तपास पथक नेमण्यात अाले अाहे. यातून जे पुरावे समाेर येतील त्यानुसार दाेषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पाेलिस सहअायुक्त सुनील रामानंद यांनी दिली. या दंगलीच्या वेळी काही युवकांचे टाेळके शस्त्रे घेऊन फिरल्याचीही माहिती अाहे. ही घटना पूर्वनियाेजित हाेती का, हा तपासाचा भाग असून लवकरच अाराेपींची अाेळख पटेल, असे त्यांनी सांगितले.

वादाचे क्षुल्लक कारण
पर्वती दर्शन येथे काही युवक उभे असताना समाेरील रस्त्यावरून येणा-या माेटारसायकलचा उजेड त्यांच्या चेह-यावर पडला. त्यांनी ‘दुचाकीची लाइट का मारता?’ अशी विचारणा केली. याच कारणावरून समाेरील गटाच्या लाेकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. स्थानिक युवकांनी त्याला प्रत्त्युत्तर दिले अन या हाणामारीचे पर्यवसान दंगलीत झाले.
छायाचित्र: पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या दगडफेकीत असंख्य वाहनांचे नुकसान झाले. पाेलिसांनी बुधवारी या भागात चाेख बंदाेबस्त ठेवल्याने तणाव निवळला हाेता.