आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदू सरकारवर बंदीची मागणी; कोर्टात तक्रार अर्ज दाखल, मधुर भांडारकर यांना करण्यात आले प्रतिवादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- इंदू सरकार या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी, यासाठी पुण्यात अन्वर शेख नावाच्या एका व्यक्तीने न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. अॅड. वाजिद खान-बीडकर यांनी शेख यांच्यावतीने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. 
 
या याचिकेत दिग्दर्शक मधुर भांडारकर, निर्माते भरत शहा, अभिनेते अनुपम खेर, निल नितीन मुकेश यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. आयपीसीच्या कलम 133, 142, 143 आणि 144 चा आधार घेत हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.  न्यायाधीश पी. टी. शेजल हे सोमवारी यावर सुनावणी करणार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...