आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Case Register Against Sripal Sabnis At Pune, Nigadi Police Station

मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीसांविरोधात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अाक्षेपार्ह वक्तव्य करून अडचणीत अालेले मराठी साहित्य संमेलनाचे िनयाेजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविराेधात िनगडी पाेलिस ठाण्यात अदखलपात्र तर पुण्यातील समर्थ पाेलिस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. भाजप िपंपरी-िचंचवडचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव मुरलीधर थाेरात व पुण्यातील अाेबीसी सेलच्यावतीने याबाबत फिर्याद िदली अाहे.

दरम्यान, सबनीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संमेलनास येण्याचा अाग्रह केला अाहे. ‘राज्यघटनेची शपथ घेऊन सांगतो, मोदींच्या राष्ट्रवादी भूमिकेचा, बुद्ध-गांधींच्या अहिंसावादी कामगिरीचा व राष्ट्रभक्तीच्या समर्पणाचा मी नेहमीच यथार्थ गौरव केलाय. मात्र, माझ्या भाषणाचा विपर्यास करून माझी ‘संवादी’ भूमिका गैरसमजात पेरली गेली, याची खंत आहे. यापूर्वीही संमेलनाध्यक्षा दुर्गा भागवत व यशवंतराव चव्हाण यांचा वाद झाला होता, तरीही चव्हाणसाहेब संमेलनास आले होते. आपणही जरूर यावे. माझे हृदयच ‘पायघड्या’ म्हणून समर्पित करत आहे,’ असे पत्रात म्हटले अाहे.