आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारच दिवसापूर्वी पुण्यातही लागली होती बसला मोठी आग, मात्र...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आंध्र प्रदेशातील मेहबूबनगरजवळ आज पहाटे एका व्हॉल्वो बसला लागलेल्या भीषण आगीत 40 प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. बंगळूरूहून हैदराबादकडे निघालेल्या या बसमधील 50 पैकी 40 जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अशीच घटना चारच दिवसापूर्वी पुण्यात घडली होती. पीएमटीच्या एका खचाखच भरलेल्या बसची आणि कारची समोरासमोर जोरदार धडक दिल्यानंतर अशीच मोठी लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र, आजच्या मेहबूबनगरच्या दुर्घटनेमुळे पुण्यातील त्या बस आगीची पुन्हा एकदा आठवण झाली.
ही घटना पुण्यातील शिमला चौकातील मागील शनिवारची असून, पीएमटीची कात्रज-निगडी या मार्गावरील बसला एका कारने समोरासमोर धडक दिल्यानंतर काही मिनिटांतच गाडीतून धूर निघू लागला. धूर निघू लागताच बसने पेट घेतला. त्याचवेळी बसमधील प्रवाशांनी पटापट उड्या मारत आपला जीव वाचविला. थोड्याच वेळात संपूर्ण बसने जोरात पेट घेतला.
पुढे छायाचित्रातून पेटलेली बस पाहा व कशामुळे बसने पेट घेतला, ते वाचा....