आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेशी मैत्री एकदाची तोडाच, भाजपच्या बैठकीत अाग्रही मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे अाराेप झालेल्या पक्षाच्या सर्वच अाजी-माजी मंत्र्यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे खुश असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांच्यासाेबत हास्यविनाेदात रमलेले दिसले. - Divya Marathi
भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे अाराेप झालेल्या पक्षाच्या सर्वच अाजी-माजी मंत्र्यांना क्लीन चिट दिली. त्यामुळे खुश असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांच्यासाेबत हास्यविनाेदात रमलेले दिसले.
पुणे - पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा देण्याचा ठराव भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मंजूर झाला. परंतु त्याच वेळी सरकार आणि भाजपचा सतत अपमान करणाऱ्या शिवसेनेबरोबरचे संबंध तोडून टाकण्याची आग्रही मागणीदेखील याच बैठकीत आक्रमकतेने मांडली गेली. दरम्यान, शिवसेनेशी युतीबाबत व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे थोडी नरमाईची भूमिका घेतली असताना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक असल्याचे दिसून आले.

भाजपच्या दोनदिवसीय बैठकीचा समारोप रविवारी पुण्यात झाला. या वेळी राजकीय ठराव मांडत असताना शिवसेनेविरुद्धचा असंतोष उफाळून आला. भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी ‘भाजपला निझामाचा बाप म्हणणाऱ्या शिवसेनेबरोबर कसलेही नाते नको,’ अशी
थेट भूमिका घेतली. राज्यभरातून आलेल्या भाजप आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांनी टाळ्यांच्या कडकडाटात याचे समर्थन केले. ‘आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेबरोबर युती नको,’ असे मत या वेळी व्यक्त झाले.

‘शिवसेना हा सर्वात जुना मित्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची ही मैत्री विसरता येण्यासारखी नाही. त्यांना सोबत घेऊनच वाटचाल करायची आहे. दोन्ही पक्षांना माझी एकच विनंती आहे, की दोघांनीही घरातले भांडण चव्हाट्यावर आणू नये,’ असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय नेते व्यंकय्या नायडू यांनी बैठकीच्या उद‌्घाटन सत्रात केले होते. नायडूंच्या वक्तव्याला २४ तास उलटत नाहीत तोवरच भाजपच्या शिवसेनेवरील संतापाला मधू चव्हाण यांनी तोंड फोडले.
पुढे वाचा, वेगळा अर्थ काढू नका : गडकरी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...