आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयचे दाेषाराेपपत्र: सनातनचा साधक तावडेच दाभाेलकर हत्येचा सूत्रधार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डाॅ. नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येनंतर वर्षांनी सीबीअायने पुणे येथील न्या. व्ही.बी. गुळवे-पाटील यांच्या न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. यात दाभाेलकर यांच्या हत्येचा कट सनातनचा साधक डाॅ.वीरेंद्र तावडे याने रचला असल्याचे नमूद अाहे. तर, सनातन संस्थेशी संबंधित सारंग अकाेलकर अाणि विनय पवार यांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात अाला अाहे.

सीबीअायचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस.अार. सिंग यांनी डाॅ.दाभाेलकर हत्या प्रकरणाशी संबंधित २४ पानी दाेषाराेपपत्र, तावडे याच्या पनवेल येथील घरातून जप्त केलेली सनातन संस्थेशी संबंधित मूळ कागदपत्रे, खटल्याशी निगडित दस्त, संशयित अाराेपींची रेखाचित्रे, सीसीटीव्ही फुटेज अाणि सारंग अकाेलकर याच्या घरातील काही कागदपत्रे अशी सुमारे २०० टिपणे न्यायालयात सादर केली.

डाॅ.दाभाेलकर यांची हत्या ही हिंदू देवदेवता, संत यांच्या विराेधात केलेल्या वक्तव्यामुळे तसेच त्यांनी चमत्काराला अाव्हान िदल्याने नियाेजनबद्धरीत्या केलेली हत्या असल्याचा निष्कर्ष सीबीअायने काढला अाहे. अाराेपींवर खुनाचा अाणि गुन्हेगारी कट रचणे अशा कलमांनुसार अाराेप निश्चित करण्यात अाले अाहेत.

ब्लॅस्टिक अहवालाची प्रतीक्षा : दाभोलकर हत्या प्रकरणी ब्लॅस्टिक अहवाल अद्याप परदेशातून प्राप्त झालेला नाही. ताे अाल्यानंतर या हत्येतील आणखी काही पैलू समोर येतील. त्या दिशेने तपास होईल. या गुन्ह्यात वापरली गेलेली माेटारसायकल फरार अाराेपी यांचाही अद्याप शोध घ्यावयाचा असल्याचे सीबीअायने म्हटले आहे.

डाॅ. दाभाेलकर यांचा मुलगा डाॅ. हमीद यांनी सीबीअायने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. अाजपर्यंत केवळ संशय व्यक्त होत हाेता. २००९ पासून फरार असलेल्या अकाेलकर पवार यांना जोवर अटक केली जात नाही तोवर असे प्रकार घडतच राहतील, असे डॉ. हमीद म्हणाले. काॅ. पानसरे साहित्यिक कलबुर्गी यांच्या हत्येशी यांचा काही संबंध अाहे का, याचाही तपास व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.

सहा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार
डाॅ. दाभाेलकर यांची हत्या २० अाॅगस्ट २०१३ राेजी सकाळी पुण्यात झाली. त्या वेळी सहा सफाई कामगारांनी गाेळीचा अावाज ऐकला होता. दाेन हल्लेखाेर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पळून गेल्याचे कामगारांनी पाहिले होते. तेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. दरम्यान, सारंग अकाेलकर, विनय पवार इतरांनी दाभाेलकरांची हत्या केल्याचे सबळ पुरावे असल्याचे सीबीअायने म्हटले अाहे.

विविध आंदोलनांत सहभाग
काेल्हापूर येथे सन २००४ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. गाेविंद पानसरे यांच्या विराेधात तावडेने माेर्चा काढला हाेता. याच वेळी फादर विजय िफलिफ्स यांनी एका हिंदू महिलेचे धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप झाला तेव्हा तावडे याने आंदोलन करून फिलिफ्स यांच्या विराेधात कारवाई करण्याची मागणी केली होती. २००६ पर्यंत त्याची विविध अांदाेलने सुरू हाेती. त्यानंतर ताे पनवेल येथील सनातच्या अाश्रमात राहावयास गेला.

वीरेंद्र तावडे : डाॅक्टर ते साधक
सीबीअायच्यामते, वीरेंद्र तावडे याने मुंबईतून एमबीबीएसची पदवी घेतली. १९९८ मध्ये कोल्हापूर येथे सनातनचे जयंत अाठवलेंच्या भाषणाने प्रभावित हाेऊन ताे सनातनच्या संपर्कात अाला. २००१ नंतर ताे पूर्णवेळ साधक बनला. सन २००३ मध्ये तो सनातनचा समन्वयक झाला. २००५ पर्यंत काेल्हापूर येथेच तो काम करत हाेता. याच काळात काेल्हापूर येथील संजय अरुण सडवलीकर यांच्या तो संपर्कात हाेता, असेही पुरावे आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, संजय साडवीलकर यांनी या प्रकरणी दिलेली साक्ष...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...