आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सीसी टिव्ही कॅमेरांसाठी 30 कोटींची तरतुद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणॆ - नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले. या कामासाठी राज्य सरकार, आमदार व दोन्ही महापालिकांच्या निधीतून 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी जाहीर केली.
पुण्यात एक ऑगस्ट रोजी झालेल्या चार बॉम्बस्फोटांनी राज्य आणि केंद्र सरकार हादरले आहे. स्फोटांना पाच दिवस उलटले तरीही तपास यंत्रणा अद्याप कोणत्याही ठोस निर्णयाप्रत पोहोचलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या हल्ल्यांचा तपास करताना संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे हा शोधकार्यातील अतिशय महत्त्वाचा आणि खात्रीशीर मार्ग समजला जातो. पण पुण्यात झालेल्या स्फोटांनंतर जंगली महाराज रस्त्यावरील सीसीटिव्ही यंत्रणा बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात जर्मन बेकरी स्फोटानंतर शहरात तातडीने महत्त्वाच्या ठिकाणी दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना एका प्रस्तावाद्वारे केली गेली होती. प्रत्यक्षात महापालिका आणि पोलिस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने ही योजना बारगळली.
दरम्यान, रविवारी सकाळी अजित पवार यांनी पुण्यात ज्येष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेतली. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख राकेश मारिया, पुण्याचे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त शहाजी सोळुंके, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज लोहिया, मनपा आयुक्त महेश पाठक, जिल्हाधिकारी विकास देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे पवार यांनी जाहीर केले. या कामासाठीची 30 कोटींची रक्कम पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा, राज्य सरकार तसेच आमदार निधीतून उपलब्ध केली जाईल, असे पवार म्हणाले.
पुणे स्फोट : इंडियन मुजाहिद्दीन पोलिसांच्या रडारवर
पुणे स्फोट: संशयित दयानंदचा दुवा कच्चा; तपासाला दिशा नाही, आरोपींची रेखाचित्रे
पुणे स्फोट : पावसाच्या हलक्या सरींनी वाचविले शेकडो पुणेकरांचे प्राण