आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरा डोळाः पुण्यावर १२५० सीसीटीव्हींची नजर, शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -विद्येचे माहेरघर, उद्योगनगरी अशी ओळख असलेले पुणे देशातील एक संवदेनशील शहर म्हणून ओळखले जाते. मागील काही वर्षात दहशतवादी हल्ल्याचा पुण्याला फटका बसल्याने पुणे अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून शहरात १२५० सीसीटीव्ही बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पुणे राज्यातील पहिले सीसीटीव्ही निगरानीचे शहर बनले असून शनिवारी मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांचे हस्ते या सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडेल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त के.के.पाठक, सहपाेलिस अायुक्त सुनील रामानंद, जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.

बापट म्हणाले, २२५ कोटींची सीसीटीव्ही योजना राज्यशासनाच्या मदतीने अलार्इड डिजिटल कंपनीने पूर्णत्वास नेली आहे. यामुळे पुण्यातील ६५० किलोमीटरचा परिसर सीसीटीव्ही निगरानीखाली येणार असून त्यात पुणे व पिंपरी-चिंचवडच्या १४०० ते १६०० चौकांचा समावेश अाहे. महत्वपूर्ण ५० संवेदनशील सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते, चौक सीसीटीव्ही निगराणी ठेवली जार्इल. वाहतुकीस सुरळीत चालण्यासाठी प्रमुख २५ ठिकाणी विशेष प्रकारचे एनपीआर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ५० तंत्रकुशल स्टाफच्या मदतीने तसेच २८ पाेलिस ठाण्याच्या सहकार्याने सीसीटीव्ही फुटेज देखभाल होईल.

पुणे अतिरेक्यांच्या रडारवर
काही वर्षांपूर्वी जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फाेटानंतर पुणे शहर हे अतिरेक्यांच्या रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून या शहरात अाणखी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. त्यापाठोपाठ जंगली महाराज रस्त्यावरही बोम्बस्फोट झाले होते. पुण्यातील गणेशोत्सव देश- विदेशात प्रसिद्ध आहे. या काळातही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागते. आता त्यांना सीसीटीव्ही यंत्रणांची मदत हाेणार
आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे आजवर दोनशे गुन्हे आले उघडकीस
पोलिस आयुक्त के.के.पाठक यांनी सांगितले, सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणचे गुन्हे उघड झाले. खून, दरोडा, सोनसाखळी चोरी, अपघात असे विविध २०० गुन्हे आतापर्यंत उघडकीस आले. गेल्या दोन महिन्यांत वाहतूक शाखेने नियम न पाळणाऱ्या १५०० जणांना सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दंड ठोठावला आहे.
बातम्या आणखी आहेत...