आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी-डॅक आणणर तीन नवी उत्पादने, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्युटिंग (सी-डॅक) च्या वतीने 26 व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून तीन नवी उत्पादने सादर करण्यात येणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत संस्थेच्या या उत्पादनांचे लोकार्पण होईल, अशी माहिती सी डॅकचे महासंचालक रजत मुना आणि कार्यकारी संचालक हेमंत दरबारी यांनी येथे दिली.

टी लर्निंग सूट (शैक्षणिक), बायो - केमिस्ट्री अ‍ॅनलायझर (वैज्ञानिक विश्लेषक) आणि ईडीजीई (नेटवर्क सोल्यूशन) अशा त्रिविध क्षेत्रातील ही तीन उत्पादने असून, अधिकाधिक नागरिकांना या उत्पादनांचा थेट उपयोग करता येणार आहे, असे सांगून मुना म्हणाले, सी डॅकच्या उत्पादनांचा जनसामान्यांना थेट फायदा व्हावा, यादृष्टीने भावी काळात संशोधन केले जाणार आहे. टी लर्र्निंग सूट हे प्रामुख्याने शैक्षणिक सक्षमीकरणाचा हेतू समोर ठेवून विकसित केलेले तंत्रज्ञान आहे.

बायो केमिस्ट्री अ‍ॅनलायझर हे अर्थातच आरोग्याशी निगडित आहे. जैवरासायनिक विश्लेषक असे त्याचे स्वरूप आहे. हे वैद्यकीय प्रयोगशाळेतील उपकरण देशात आयात करावे लागते. त्यामुळे अर्थातच त्याच्या वापराची किंमत मोठी असते. पण सी - डॅकने तो विकसित केल्याने वाजवी किमतीत रक्ताच्या विविध चाचण्या कमी वेळात अधिक संख्येने करणे शक्य होणार आहे. ईडीजीई (एन्टरप्राइज वाइड सेल्फमॅनेज्ड नेटवर्क सोल्यूशन) हे व्यवस्थापन आणि संनियंत्रणविषयक सोल्यूशन आहे.