आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा, मात्र शासनाला पुष्पवृष्टीसाठी मिळाले नाही हेलिकॉप्टर !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाबळेश्वर- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रताप’ दिनाचे आयोजन केले जाते. यंदाही रविवारी पारंपरिक पद्धतीने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली नाही. कारण यासाठी सरकारला हेलिकॉप्टरच उपलब्ध होऊ शकले नाही. दहा वर्षात प्रथमच ही ‘परंपरा’ खंडित झाली. त्यामुळे उपस्थित शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. मात्र तरीही शिवप्रेमींचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता. 


या वेळी शालेय विद्यार्थी तसेच अनेक युवकांनी पाल चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, आगीचे खेळ आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांची मने जिंकली. ढोल, ताशे, तुताऱ्यांच्या निनादासोबतच पोवाडा, कीर्तन, घोषणांनी आसमंत दणाणला होता. 

बातम्या आणखी आहेत...