आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट रोखण्यासाठी आधुनिक सेलफोन जॅमर वापरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशाच्या विविध भागांत, विशेषत: जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यात रिमोट कंट्रोलचा वापर करून स्फोट घडवणारे दहशतवादी गट कार्यरत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात अशा ‘आयईडी’ (इम्प्रूव्ह्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाईस) हल्ल्यांची संख्या वाढली आहेत. हे हल्ले परतवण्यासाठी आणि अशी स्फोटके शोधून हानी टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रेडिओ आणि सेलफोन जॅमरचा वापर करण्याचा प्रस्ताव लष्कराच्या विचाराधीन आहे, अशी माहिती लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी येथे दिली. सध्या १०० मीटर अंतरावरील स्फोटकांचा वेध घेणारी यंत्रणा वापरली जात आहे. मात्र लवकरच ५०० मीटर अंतरावरील स्फोटकांचा वेध घेणाऱ्या अत्याधुनिक रेडिओ व सेलफोन जॅमरचा वापर सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

खडतर प्रशिक्षणाने ‘बीईजी’मध्ये घडले धाडसी जवान : लष्करी पार्श्वभूमी नसूनही खडतर प्रशिक्षणाने युवकांचे लढवय्या जवानांमध्ये रूपांतर करण्याची किमया ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप’मध्ये घडत आहे. येथील ९४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेले जवान लष्करात ज्यूनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू होतात. भूसुरुंगांचा शोध घेऊन ते निकामी करण्याचे काम ते करतात.
बातम्या आणखी आहेत...