आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Govt. May Gets Sanctioning Pune Metro Project

पुणे मेट्रोला महिन्याभरात मंजुरी, केंद्रीय पातळीवर हालचालीस वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्र सरकारकडे मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाला येत्या महिन्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण पुणे मेट्रोसंदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे केंद्र सरकारने महापालिकेकडे मागितली आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मेट्रोला मंजूरी दिली जाणार आहे. तसेच केंद्राच्या आगामी अंदाजपत्रकात निधी मिळण्याची शक्यता आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संयुक्तरित्या मेट्रो प्रकल्प राबविणार आहेत. त्यासाठी एक कंपनी स्थापन केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वनाझ कॉर्नर (कोथरूड) ते रामवाडी तर कात्रज-स्वारगेट ते रामवाडी या मार्गावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रस्ताव सादर केल्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने या प्रकल्पास मंजूरी दिली आहे. त्यानंतर अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव आता केंद्राकडे पोहचला आहे. तसेच मार्चच्या पहिल्या आठवडयात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वीच या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी पुणे मेट्रोला मान्यता न दिल्यास भविष्यात हा प्रकल्प आणखी काही वर्षभर रेंगाळू शकतो. तसे झाल्यास या प्रकल्पाचा खर्च दिवसेंदिवस वाढणार आहे. असे असले तरी केंद्र सरकार बरेच प्रशासकीय कामाचे निर्णय येत्या महिन्याभरात घेण्याची शक्यचा आहे. त्यामुळेच मेट्रोला महिन्याभरात परवानगी मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्यातच पालिकांकडून दोन-तीनदा मेट्रोसंबंधी कागदपत्रे केंद्र सरकारने मागवून घेतल्यानेच या महिन्याभरात मंजूरी मिळेल असे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यासाठी विशेष करून प्रयत्नशील आहे. तसेच याबाबत अंदाजपत्रकात काही रक्कमेची तरतूद केली वाजू शकते. केंद्रात पुन्हा काँग्रेस आघाडीचे सरकार येईल की नाही याची शाश्वती नाही म्हणून चव्हाण त्याआधीच मंजूरी घेण्याच्या बाजूने आहेत. दरम्यान, प्रशासकीय पातळीवरून काददपत्रे मागवून घेतल्याने व पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तसे संकेत दिल्याने येत्या महिन्याभरात परवानगी मिळण्याची शक्यता जास्त आहे.