आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Govt Ask Question To State Govt About Sanjay Dutt\'s 4 Times Parole Leave

संजय दत्तला वारंवार पॅरोल का दिला जातोय? केंद्राने राज्य सरकारला फटकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत दोषी ठरलेला अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते, अशी विचारणा केंद्राच्या गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात केंद्राकडे सुपूर्त करावा, असे आदेशही राज्य सरकारला दिले आहेत.
संजय दत्तला गेल्या आठवड्यात चौथ्यांदा पॅरोलची सुटी देण्यात आली. संजय गेल्या 8 महिन्यांपासून पुण्यातील येरवडा जेलमध्ये आहे. मात्र यातील चार महिने त्याला पॅरोलची सुटी मंजूर झाली आहे. त्यामुळे याबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. कायद्याने सर्व लोक सारखेच असताना संजयला वारंवार मिळणा-या पॅरोलमुळे सामान्य कैद्यांत नाराजीचे सूर आहे. मुंबईसारख्या शहरात घडलेल्या बॉम्बस्फोटांत संजयचा हात असल्याने त्याच्यावर केल्या जाणा-या मेहरबानीवर नागरिकही नाराज आहेत. त्यामुळे या नाराजीची दखल केंद्राने घेतल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्रीच डोंबिवलीत झालेल्या सभेत राज्य सरकार व संजय दत्तवर टीकास्त्र सोडले होते. संजय दत्तला कोर्टाने दोषी ठरवले आहे. तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पण तो तुरुंगात जातो काय व पुन्हा देवळातील घंटा वाजविल्यासारखे बाहेर येतो काय, असे म्हणत राज्य सरकारचे वाभाडे काढले होते.
संजय दत्तची दिवाळी घरी, नाताळही घरी, सारे काही घरी. मग हाच न्याय प्रज्ञासिंग ठाकूर यांना का नाही, असा रोखठोक सवालही त्यांनी केला होता. कर्नल पुरोहित हे कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना जखमी झाले. त्यांच्या गुडघ्याला मार लागला. मात्र त्यांना बॉम्बस्फोटांच्या आरोपाखाली तुरुंगात सडवत ठेवले आहे. देशासाठी लढणे हा गुन्हा आहे काय? त्यांच्याविरुद्ध पुरावे असतील तर जरूर खटला चालवा, असे सांगत देशद्रोही संजय दत्तला एक न्याय व देशासाठी लढणा-या पुरोहितांना वेगळा न्याय कशासाठी असा सवाल उपस्थित केला होता.