आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्मारकाला केंद्राची मंजुरी; भूमिपूजन मुहूर्त मात्र हुकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - अरबी समुद्रातील शिवस्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात दिली. मात्र, १९ फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे या कामाचे भूमिपूजन केले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक पुण्यात झाली. पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, शिवस्मारकाच्या कामाच्या निविदा काढल्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम करावे, असे मत समितीने व्यक्त केले. त्यामुळे नियोजित भूमिपूजन पुढे ढकलले आहे.