आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायदा अनुकूल दिसताच भुजबळांच्या सुटकेसाठी भाजपच्या मंत्र्याची ‘प्रार्थना’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात २० महिन्यांपासून तुरुंगात अाहेत. याचे श्रेय आजवर किरीट साेमय्यांसह व भाजपचे इतर नेते घेत होते. मात्र ‘पीएमएलए’ कायदा दुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाच्या  निर्णयामुळे भुजबळांच्या जामिनाच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत. त्यामुळे अाेबीसी वर्गात भाजपविषयीचा असंताेष कमी करण्याच्या हेतूने केंद्र व राज्य सरकारच्या २ मंत्र्यांनी पुण्यात महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या ‘समता दिन’ कार्यक्रमात भुजबळांच्या कार्याचे जाहीरपणे काैतुक केले.

 

मंत्री कांबळे म्हणाले
‘भुजबळ हे गाेरगरिबांसाठीचे लढवय्ये नेते आहेत. ते सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकले अाहेत. मात्र ज्या कलमाच्या अाधारे त्यांना जामीन मिळत नव्हता ते अाता सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने भुजबळ लवकरच बाहेर येवाेत, अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना अाहे.’ 

 

मंत्री कुशवाह म्हणाले
‘महात्मा फुलेंच्या या कार्यक्रमात छगन भुजबळांची अनुपस्थिती जाणवत अाहे.  ते नेहमी शरद पवारांशेजारी असत. सामाजिक चळवळीत काम करत नसते तर त्यांच्यावर अाज ही वेळ अालीच नसती.’ 


पवारांची सावध भूमिका

भुजबळांनी समता परिषदेद्वारे फुलेंचे विचार देशभर नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली, इकतेच वक्तव्य शरद पवार यांनी केले. भुजबळ तुरुंगात अडकून पडल्यामुळे समर्थकांमध्ये पवार व राष्ट्रवादीविराेधातही अनेकदा नाराजीचा सूर निघालेला आहे.

 

कुशवाह भुजबळांचे समर्थक

बिहारचे खासदार असलेले केंद्रीय राज्यमंत्री कुशवाह हे सुरुवातीपासूनच भुजबळ समर्थक मानले जातात. छगन भुजबळ यांनी तेथील राज्यात समता परिषदेचे जे मेळावे घेतले, कार्य केले त्यात कुशवाह यांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून भुजबळांना साथ दिली हाेती.


सुप्रीम काेर्टाचा या निर्णयाने भुजबळ सुटणार?

हवाला व आर्थिक गैरव्यवहारातील अाराेपींच्या मालमत्तेच्या जप्तीची तरतूद असलेल्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्टचे कलम ४५ हे राज्यघटनेतील तरतुदींचा भंग करणारे असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने नुकतेच व्यक्त करून ते रद्द  करण्याचा निर्णय दिला हाेता. या कलमानुसार संशयित जाेपर्यंत निर्दाेष सिद्ध हाेत नाही ताेपर्यंत त्याला जामीन मिळत नाही. हा घटनादत्त स्वातंत्र्याच्या अधिकाराचा भंग असल्याचे काेर्टाचे म्हणणे अाहे. याच निकालामुळे भुजबळ काका-पुतण्यांना जामिनाच्या अाशा पल्लवित झाल्या अाहेत. त्यावर अाता  ५ डिसेंबरला निर्णय हाेणार अाहे.

 

 

पुढे स्लाईडद्वारे वाचा, यासंबंधित फोटोज व माहिती.....

बातम्या आणखी आहेत...