आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकणमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत सत्तेसाठी चुरस, सत्तेची चावी अपक्षांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. मात्र, शिवसेनेला 8 मिळाल्या आहेत तर राष्ट्रवादीला 7 जागा जिंकता आल्या. 6 जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. तर भाजपला एका जागी यश मिळाले आहे. शिवसेनेने भाजपसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे.
शिवसेना व राष्ट्रवादीने जवळपास सारख्याच जागा जिंकल्याने त्यांना सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अपक्ष कोण खेचणार यावर सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. दोन अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...