आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिस चषक : लिएंडर पेसला विश्वविक्रमाची संधी! अाजपासून भारत व न्यूझीलंड झुंजणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- यजमान भारतीय संघ अापल्या घरच्या मैदानावर डेव्हिड चषकाच्या अाशिया/अाेशियाना ग्रुप-१ मध्ये न्यूझीलंडच्या अाव्हानाला सामाेरे जाणार अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याला पुण्याच्या टेनिस काेर्टवर  शुक्रवारपासून सुरुवात हाेईल. या सामन्यादरम्यान भारताच्या अनुभवी टेनिसस्टार लिएंडर पेसला विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी अाहे. ताे सध्या या विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे.
    
५६ व्या डेव्हिस चषकात खेळणार : १८ वेळच्या  ग्रँडस्लॅम चॅम्पियन लिएंडर पेसने अापल्या टेनिस करिअरमध्ये अातापर्यंत ५५ डेव्हिस चषक सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले अाहे. अाता त्याला ५६ व्या सामन्यात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली अाहे.  
 
४३ व्या विजयाने विक्रम : पेसला दुहेरीत  एका विजयाने विश्वविक्रमाला गवसणी घालता येईल.  त्याला शनिवारी याची संधी अाहे.त्याने अातापर्यंत पुरुष दुहेरीत ४२ विजय संपादन केले अाहेत. यासह त्याने इटलीच्या निकाेलच्या विक्रमाची बराेबरी साधली.

असे रंगणार सामने  
- एकेरी : युकी भांबरी वि. टिअरनी    
- एकेरी : रामकुमार रामनाथन  वि. जोस स्टॅथम,  
- दुहेरी : लिएंडर पेस-विष्णू वर्धन  वि. सिटाक व मायकेल व्हीनस    
- द्वितीय दुहेरी : युकी व रामनाथन  वि.  फिन टिअरनी व जोस स्टॅथम
बातम्या आणखी आहेत...