आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात माओवादी नक्षलवाद्याला सपत्निक अटक, आज कोर्टात सादर करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- अरूण भेलके)
पुणे- महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनिटने सोमवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात नक्षलवादी अरुण भानुदास भेलके ऊर्फ संजय कांबळे याला पकडले. बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेसाठी तो पुण्यातील तरुणांना भडकावून नक्षलवादी चळवळीत ओढत असल्याची माहिती पुढे आली आहे. भेलकेंने पुण्यात ‘मास मूव्हमेंट’ ही संघटना स्थापन केली आहे. त्याच्यासोबत राहत असलेल्या त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. आज या दोघांना पुणे सेशन कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

अरुण भानुदास भेलके ऊर्फ शरमन जाधव ऊर्फ संजय कांबळे ऊर्फ राजन ऊर्फ संघर्ष ऊर्फ आनंद (वय 38) अशी नावे घेऊन वावरणारा हा नक्षलवादी मूळचा चंद्रपूर शहरातील आहे. बल्लाशा आंबेडकरनगरमध्ये राहणारा अरुण भेलके हा देशभक्ती युवा मंचचा माजी अध्यक्ष आहे. तो या मंचाच्या माध्यमातून सीपीआय (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेसाठी तरुणांना भरती करण्याचे काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो भवानी पेठेतील कासेवाडी झोपडपट्टीत राहत होता.