आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जवान चंदू चव्हाण देशात पुन्हा परतेल : राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारत- पाकिस्तान सीमेवर तैनात असलेला व चुकून सीमारेषा अाेलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात अाहे. त्यांना भारतात परत अाणण्यासाठी परराष्ट्र खात्याच्या मदतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत अाहे. अाज ना उद्या ताे भारतात परतेल; मात्र त्याची निश्चित वेळ सांगता येणार नाही. त्याचे कुटुंबीय धुळे िजल्ह्यात माझ्या मतदारसंघातील रहिवासी असून मी त्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बाेलताना दिली.

भामरे म्हणाले, ‘वन रँक वन पेन्शनसंबंधित विषय ४० वर्षे प्रलंबित हाेता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी सत्तेवर अाल्यावर सदर प्रश्न मार्गी लावला अाहे. त्याच्या अंमलबजावणीत काही त्रुटी असतील तर त्यांची तपासणी केली जार्इल. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरसिंह रेड्डी यांनी त्यांचा चाैकशी अहवाल शासनाला सादर केला असून त्यावर विचारविनिमय करण्यात येत अाहे. पंतप्रधानांचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न असून भारत अाता संरक्षण सामग्री अायात करणारा देश नसून स्वदेशी तंत्रज्ञानावर भर दिला जात असल्याचेते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...