आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: नॅक प्रक्रियेत लवकरच बदल; प्रा. व्ही. एस. चौहान यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ‘नॅक’च्या (राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद) मूल्यमापनाच्या पद्धतीत लवकरच बदल केले जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून मूळ प्रक्रियेतील क्लिष्टता काढली जाईल आणि मूल्यमापन करणाऱ्या समितीवर बंधने घातली जाणार आहेत, अशी माहिती ‘नॅक’च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा. व्ही. एस. चौहान यांनी दिली.  

सध्या नॅक समिती दर्जा ठरवताना पारंपरिक निकषांचा वापर करत आहे. मात्र, आता समिती माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार आहे. कॉलेज, विद्यापीठे यांना ऑनलाइन अर्ज भरताना खरी माहितीच द्यावी लागेल. प्रत्यक्ष तपासणी करायला जाणाऱ्या समितीवरही अधिक बंधने असतील.  समिती सदस्यांची सध्याची  १० ते १५ ही संख्याही कमी केली जाईल. तसेच मानवी चुका टाळण्याचा प्रयत्न यापुढे होईल, असेही चौहान म्हणाले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ‘देशात अधिकाधिक क्षेत्रात स्टार्टअप सुरू होण्यासाठी थेट वसतिगृहांच्या पत्त्यावरच नोंदणीची सुविधा सुरू केली आहे. त्यात ४०० जणांनी नोंदणी केली आहे. 

स्मार्ट इंडिया हॉकेथानमध्ये विविध मंत्रालयांना भेडसावणाऱ्या सहाशे समस्यांवर अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी दोन हजार स्टार्टअप तयार केले आहेत. देशात प्रत्येकी १० खासगी आणि २० जागतिक विद्यापीठांची निर्मितीप्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.’   

रँकिंग प्रक्रियेत सुधारणा
एनआयआरएफच्या रँकिंग प्रक्रियेत सुधारणेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुढील वर्षापासून बदल केले जातील. मात्र, खासगी कंपन्यांनी कुलगुरू व प्राचार्यांना यासंदर्भात ई-मेल्स वा मेसेज पाठवले, या म्हणण्यात तथ्य नाही. उच्च शिक्षणाच्या सुविधांसाठी सरकारने हायर एज्युकेशन फायनान्सिंग एजन्सी सुरू केली आहे.  त्याद्वारे २० कोटी उभारण्यात येतील, असे जावडेकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...