आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅसमाॅस बँकेविराेधात फसवणुकीचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - कर्ज घेण्यासाठी बँकेकडे तारण ठेवलेल्या शेतजमिनीचे खाेटे एनए तयार करून खातेधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी काॅसमाॅस काे-अाॅप. बँकेविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णाकुमार किशाेरीलाल गाेयल यांच्यासह एकूण १६ संचालकांविराेधात या प्रकरणी विनय विवेक अारान्हा यांनी पाेलिसांकडे फिर्याद दिली अाहे.

अारान्हा यांचे बँकेत खाते अाहे. बँकेने त्यांच्यासाेबत अॅडव्हान्स क्रेडिट सवलतीचा करार केला अाहे. त्यांनी बँकेतून ४६ काेटींचे कर्ज घेतले हाेते. त्यातील २० काेटींसाठी एनए लेअाऊट नसलेली शेतजमीन तारण ठेवली. त्यावर बँकेने त्यांना कर्जमंजुरी दिली. अारान्हा यांनी अॅडव्हान्स क्रेडिट सवलत नूतनीकरणासाठी अर्ज केला असता त्यावर बँकेने त्यांना तारण ठेवण्यासाठी मालमत्तांची यादी दिली. त्यात बँकेकडे पूर्वी गहाण ठेवलेल्या शेतजमिनीची ३० जानेवारी १९९७ ची एनए लेअाऊट अाॅर्डर केल्याचे आढळले. त्यानंतर अारान्हा यांनी बँकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
बातम्या आणखी आहेत...