आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cheating Of 31 Year Old HR Lady Through Jivansathi.com

पुणे: जीवनसाथी डॉटकॉमवरून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला 27 लाखांना गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावरील ओळखीतून लंडन येथील एका तरुणाने पुण्यातील 31 वर्षीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवून तिची 27 लाख 59 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जेरी ब्रंच (रा.लंडन, यूके) निवा कारगोस कुरिअर सर्व्हिस यूके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी व जेरी ब्रंच यांची ऑक्टोबर 2015 मध्ये जीवनसाथी डॉटकॉम या संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याकडून 27 लाख रुपये उकळले. त्यानंतर तरुणीने ब्रंच विरोधात तक्रार दिली.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अनुरूप साथीदाराच्या शोधात असलेल्या उच्चशिक्षित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रोमोनी साईटवर नोंदणी केली. महिन्याभरापूर्वी ब्रिटनमधील एका भामट्याने तिला विवाहाचा प्रस्ताव पाठविला. चॅटिंगच्या माध्यमातून दोघांचे सूर जुळले. महागडे गिफ्ट पाठविण्याच्या आमिषाने या भामट्याने या तरुणीकडून वेळोवेळी 27 लाख 59 हजार रुपये उकळले. या अमिषा पोटी तरुणीने स्वत:चा फ्लॅट, भावाची कार देखील विकली. जीवनसाथीच्या शोधात असलेली ही तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
जेरी ब्रंच (रा. लंडन, इंग्लंड) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे. तरुणीने यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तरुणीने एका खासगी कंपनीत एचआर विभागात आहे. ही तरुणी अनुरूप साथीदाराच्या शोधात होती. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या या तरुणीने 5 ऑक्टोबर रोजी जीवनसाथी डॉटकॉम या वेबसाईटवर नोंदणी केली. जेरी ब्रँच हा भामटा तिच्या संपर्कात आला. 15 दिवस हे दोघेजण व्हॉटसअप, ई-मेलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहिले. त्याने विवाहाचे आमिष दाखविले. या अमिषाला ती बळी पडली. त्यानंतर त्याने लंडनहून 95 हजार डॉलर, हिरेजडीत नेकलेस, रिंग, चेन अशा वस्तू गिफ्ट पाठवल्या आहेत, अशी बतावणी केली. कुरिअरचे पार्सल स्वीकारण्यासाठी 5 लाख 53 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. भामट्याने दिलेल्या बँक खात्यात तरुणीने ही रक्कम जमा केली.
दहशतवादी असल्याची धमकी
कस्टमला 17 लाख 999 रुपये 10 नोव्हेंबरपर्यंत भरावे लागतील. अन्यथा दहशतवादी असल्याची कारवाई तुझ्यावर होईल, अशी धमकी दिली. घाबरलेल्या तरुणीने स्वत:चा फ्लॅट विक्रीस काढला. या फ्लॅटच्या व्यवहारातून जी काही रक्कम मिळाली ती तिने बँक खात्यात भरली. तिने लहान भावाला कार खरेदी करून दिली होती. ही कार देखील तिने विकून जेरी ब्रंच या भामट्याला पैसे दिले. अखेर भामट्याने पाठविलेले पार्सल तिला मिळाले नाही. फसवणूक झालेल्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी तिला धीर दिला. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे तपास करीत आहेत.
सॅलसबरी पार्कमधील उद्योजक महिलेला गंडा-
वर्षभरापूर्वी पतीच्या निधनानंतर एकाकी असलेल्या सॅलसबरी पार्कमधील उद्योजक महिलेला मॅट्रोमोनी वेबसाईटच्या माध्यमातून गंडा घातला होता. परदेशातून गिफ्ट पार्सल पाठविण्याच्या आमिषाने तिची 41 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ‘नायजेरीयन फ्रॉड’ असे म्हणतात.