आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात सरकारी नोकरी लावतो म्हणून 6 जणांची साडेअकरा लाखाची फसवणूक; आरोपी फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 

पुणे- पिंपरी-चिंचवड येथे काळेवाडीत स्पर्धा परिक्षांचे क्लास घेणाऱ्या शिक्षकाने 6 जणांना शासकीय नोकरीत रुजू करतो म्हणून तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांना गंडा घातला आहे. रवींद्र विक्रम जाधव अस आरोपी शिक्षकाे नाव असून तो हा फरार आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र विक्रम जाधव (वय 45, रा.बीड) हा गेल्या काही महिन्यांपासून फिर्यादी संजय पांडुरंग लोखंडे (वय 46, रा.थेरगाव) यांच्या आदर्श क्लासेसमध्ये स्पर्धा परिक्षेची शिकवणी घेत होता. या क्लासमध्ये 6 विद्यार्थी होते. त्यांना  समाज कल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क, बालकल्याण विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क येथे क्लार्क पदासाठी जागा निघाल्या असून तेथे मी तुम्हाला नोकरी लावतो असे रवींद्र यांनी सांगितले. त्याप्रमाणे 16 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथे ऑफलाईन परीक्षा होईल आणि 30 सप्टेंबर रोजी नोकरीवर रुजू व्हाल असे सांगून सहा मुलांकडून रवींद्रने 11 लाख 60 हजार रुपये घेतले. मात्र यानंतर तो फरार झाला.

 

रोहिदास शेळके (वय 35, रा. राहटणी) याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये, प्रमोद भाऊसाहेब जोंधळे (वय 27 रा.कोकण गाव जि. अहमदनगर) 3 लाख 30 हजार रुपये, सुजाता वसंत गागरे (वय 23, रा. कानड गाव जि, अहमदनगर) एक लाख 30 हजार रुपये, प्रमोद मधुकर पाटकुले (वय 26, रा. थेरगाव,3 लाख 60 हजार रुपये,शांताराम सुभाष गायकवाड (रा. काळेवाडी 30 हजार रुपये), प्रियंका गायकवाड 30  हजार रुपये यांनी रवींद्रला पैसे दिले आहेत. मात्र अद्याप आरोपी रवींद्र फरार आहे. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...