आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरुन ओळख करुन युवकाची 2 लाखाची फसवणुक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विवाहसंस्थेच्या संकेतस्थळावरुन ओळख करुन युवकाला 2 लाखाला गंडा घालण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी महेश विलास पाटील (वय 36, रा. पवना नगर, जुनी सांगवी)यांनी सांगवी फिर्याद दिली आहे. महेश पाटील यांनी जीवनसाथी.कॉम आणि मराठी मेट्रोमनी या वेबसाईटवर विवाहसाठी नोंदणी केली होती. त्याच वेबसाईटवर काव्या जयवंतराव असलकर यांनी नोंदणी केली होती त्यात तिचा मोबाईल नंबर आणि प्रोफाइल नमूद केला होता. त्याच मोबाईल नंबर वरील व्हॉट्सअपवर महेश यांनी गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याशी चॅटिंग करत ओळख निर्माण केली. त्यांची चांगली ओळख झाल्यावर तिने माझ्या वडिलांना अॅटॅक आला असल्याचे सांगत महेशकडे पैश्यांची मागणी केली. त्याप्रमाणे महेश यांनी 25 सप्टेंबर रोजी 1 लाख 50 हजार आणि 5 ऑक्टोबर रोजी 50 हजार रुपये असे 2 लाख रुपये काव्याच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यानंतर काव्याने महेशचा फोन उचलणे आणि व्हाट्सऍपवरील संभाषण बंद केले. हे सर्व झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सांगवी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास अरविंद जोंधळे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...