आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: औषध विक्रेत्यांचा संप तिस-या दिवशी मागे, दुपारनंतर मेडिकल्स उघडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यातील औषध विक्रेत्या स्टोअर्सवर सुरु केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनने पुकारलेला बंद अखेर तिस-या दिवशी मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष व आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याने आम्ही संप मागे घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, हा संप मागे घेण्यामागे एफडीएचे आयुक्त झगडे यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा करून मध्यस्ती केल्याचे सांगितले जात आहे. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार आहेत.

मेडिकल स्टोअर्समध्ये आवश्यक असलेली पदवी (फार्मासी) घेतलेला फर्मासिस्ट हवा असल्याचे नियम अन्न व प्रशासन प्रशासनाने घेतला आहे. तरीही मुंबई, पुणेसारख्या शहरात फार्मासिस्ट नसलेले तरूण-तरूणी औषधे विक्री करताना आढळले आहेत. त्याविरोधात एफडीएने मागील काही दिवसापासून कारवाई सुरु केली होती. मात्र, कारवाई थांबवावी अशी मागणी करीत या बाबीचा निषेध म्हणून गुरुवारपासून मेडिकल स्टोअर्स बंद पुकारण्यात आला होता. तसेच केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी एफडीएच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. गेली दोन दिवस व आजचा सकाळी 11 पर्यंत पुणे शहरातील बहुतेक मेडिकल स्टोअर्स बंद होती.
अखेर आज सकाळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी एफडीएकडून यापुढे कारवाई करताना कोणती काळजी घ्यावी यासाठी अधिकारी व कर्मचा-यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर केमिस्ट असोसिएशनने बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले. गेली दोन दिवस पुणे शहरातील सुमारे ७ हजार मेडिकल स्टोअर्स बंद होती. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता.