आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात चेन्नई - कुर्ला एक्स्प्रेसमध्ये दोघांकडून 15 किलाे साेने जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - चेन्नई- कुर्ला एक्स्प्रेसमधून राजस्थानच्या दोघांकडून १५ किलाे सोने जप्त करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी दिली. बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत ही ३८ लाख रुपये असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. सुमेर मुकन सिंह आणि हरिअाेम पुरुषाेत्तम पारिक अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सहा मार्च राेजी दुपारी पावणेपाच वाजता पुणे स्थानकावर चेन्नर्इ-कुर्ला एक्स्प्रेस गाडी अाली. या वेळी एसी बाेगीत पाेलिसांना दाेन संशयित प्रवासी आढळले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता बॅगमध्ये १५ किलाे ५६० ग्रॅम सोने आढळून आले. पोलिसांनी दोघांकडे दागिन्यांच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर आयकर विभागाला या घटनेबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार आयकर विभाग दोघांकडे सोने कुठून आणले, याबाबत चौकशी करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...