पुणे- महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांची रविवारी (19 फेब्रुवारीला) राज्यभर उत्साहात जयंती साजरी झाली. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शिवाजी महाराज यांच्याविषयी रंजक माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती? असे जर विचारले तर कुणीही सांगेल की रायगड. पण, रायगडपूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला होता, हे कदाचित अनेक जणांना माहित नसेल. आज आपण या राजगड किल्ल्याविषयी जाणून घेऊया...
नेमका कुठे आहे राजगड ?
- पुण्याच्या नैऋत्येला 48 किमी अंतरावर अन् भोरच्या बायव्येला 24 किमी अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे.
- याच डोंगरावर मोठ्या थाटात राजगड उभा आहे.
- महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या तुलतेन या किल्ल्याचा बालेकिल्ला सर्वात उंच आहे.
- त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1394 मीटर आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, शिवाजी महाराजांनी राजगडला का केले राजधानी...