छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून निकोप समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम केले. अशा या महान राजाची शुक्रवार, 19 फेब्रुवारीला जयंती आहे. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने जगाच्या इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहेच. पण, या कामी त्यांच्या मावळ्यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या निवडक मावळ्यांची ही खास माहिती केवळ divyamarathi.com च्या वाचकांसाठी...
मावळे म्हणजे काय ?
महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चार्तुवर्ण व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याच्या काळातच शिवशाईचा उदय झाला. परंतु, महाराजांनी हिंदू-मुस्लीम या धर्मातील शूर-वीरांना आपल्यासोबत घेतलेच. शिवाय हिंदू धर्मातील अठरापगड जातीत सैनिकांना मानाचे स्थान दिले. त्यांनाच 'मावळे' असे म्हटले जाते. हा शब्द कुठल्याही विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा नाही तर तो स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक भूमिपुत्रासाठी वापरला गेला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला 'मावळ' आणि खोर्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, महाराजांचे सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे यांच्या विषयी...